Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

शिरोडा समुद्रात ८ पर्यटक बुडाले, ३ जणांचा मृत्यू तर एक अत्यवस्थ! ; ४ जणांचा शोध सुरू.

वेंगुर्ला : तालुक्यातील शिरोडा – वेळागर येथील समुद्रात दुपारी ४:४५ दरम्यान ८ पर्यटक बुडाल्याची घटना घडली आहे. सदर पर्यटकातील ४ जणांना समुद्रातून बाहेर काढण्यात आलेले आहे. यातील ३ पर्यटक मयत असून एक पर्यटक (महिला) अत्यवस्थ आहे. सदर महिलेस शिरोडा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. उर्वरित ४ पर्यटकांचा शोध स्थानिक शोध व बचाव पथक मार्फत सुरू आहे.

समुद्रातून बाहेर काढलेल्या पर्यटकांची माहिती –

१. इसरा इम्रान कित्तूर, वय वर्ष 17 रा. लोंढा, बेळगाव (वाचली आहे)
२. श्रीमती फरहान इरफान कित्तूर, वय 34, रा. लोंढा, बेळगाव (मयत)
३. श्री इबाद इरफान कित्तूर , वय १३ रा. लोंढा, बेळगाव (मयत)
४. श्रीमती नमीरा आफताब अख्तर वय 16, रा अल्लावर, बेळगाव (मयत)

बेपत्ता पर्यटकांची माहिती पुढीलप्रमाणे –
१. इरफान मोहम्मद इसाक कित्तूर, वय 36 रा. लोंढा, बेळगाव
२. इक्वान इमरान कित्तूर, वय 15 रा. लोंढा, बेळगाव
३.फरहान मोहम्मद मणियार, वय 20, रा. कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग
४ जाकीर निसार मणियार वय 13, रा. कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग.

घटनास्थळी पोलीस, महसूल व ग्रामीण विकास विभागाची यंत्रणा उपस्थित असून सदर प्रशासकीय यंत्रणा व स्थानिक शोध व बचाव पथकामार्फत बेपत्ता पर्यटकांचा शोध सुरू आहे. तरी कृपया नागरिकांनी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहनही प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

********

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles