Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

मिलाग्रीस प्रशालेच्या ग्रंथदिंडीने वेधले सावंवाडीकरांचे लक्ष ! ; महानुभवांच्या वेशभूषांसह विद्यार्थ्यांकडून वाचन संस्कृतीचा जागर!, मिलाग्रीसमध्ये ‘ग्रंथ दिवस’ उत्साहात साजरा!

सावंतवाडी : शहरातील मिलाग्रीस हायस्कूल या प्रशालेत ग्रंथ दिवस साजरा करण्यात आला. या अनुषंगाने ग्रंथालयामध्ये पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करून या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथील मराठी विषय विभाग प्रमुख व ज्येष्ठ प्राध्यापिका श्रीम. डॉ. शरयू आसोलकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

सर्वप्रथम ग्रंथदिंडीचे दर्शन व पुस्तक प्रदर्शन उद्घाटनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. सहाय्यक शिक्षिका श्रीम. अँथोनीसा फर्नांडिस यांनी यावेळी प्रस्तावना केली. यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिंडीचे व ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन झाल्यानंतर ग्रंथालयातून शालेय सभागृहामध्ये ग्रंथ दिंडी नेण्यात आली. सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी ग्रंथदिंडीचे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत स्वागत केले.

यावेळी विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर, संत मीराबाई, संत कबीर, शेक्सपियर तसेच महाराष्ट्रीयन वेशभूषा अशा विविध वेशभूषांचे सादरीकरण केले. कुमारी तनया सावंत इयत्ता दहावी या विद्यार्थिनीने ययाती या पुस्तकाचे समीक्षण सादर केले. तर सातवीत शिकणारी कु.प्रज्योती सावंत हिने ग्रंथ दिवसाचे महत्त्व विषद केले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या ज्येष्ठ प्राध्यापिका डॉ. शरयू आसोलकर यांनी ग्रंथालय दिवसाचे महत्त्व तसेच मानवी जीवनात पुस्तक वाचनाचे महत्त्व स्पष्ट केले. त्याचबरोबर आपण स्वतः या प्रशालेची माजी विद्यार्थिनी असून आपल्याला याचा सार्थ अभिमान आहे, असेही आवर्जून सांगितले. तसेच वाचनाने माणूस प्रगल्भ होतो त्यामुळे वाचाल तर वाचाल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट करत पसायदानाचा शुभसंदेश व्यक्त केला. यानंतर प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदाना यांनी आपला शुभ संदेश दिला. या दिवसाचे विशेष आकर्षण म्हणजे मिलाग्रीस प्रशालेच्यावतीने विद्यार्थ्यांनी ग्रंथदिंडीचे आयोजन केले होते. या दिंडीची सावंतवाडी बाजारपेठेतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये प्रशालेचे विद्यार्थी पारंपारिक वेशभूषा पद्धतीने सहभागी झाले होते.तसेच स्काऊट गाईड पथक देखील सहभागी झाले होते.
यानंतर मिलाग्रीस हायस्कूल मार्गे गोडाऊन तसेच सारस्वत बँक, आरपीडी हायस्कूल समोरून कळसुलकर हायस्कूल मार्गे पुन्हा मिलाग्रीस प्रशालेपर्यंत येऊन या ग्रंथदिंडीचा समारोप करण्यात आला.

प्रशालेच्या वतीने सहाय्यक शिक्षिका नेवीस सालदान्हा यांनी सर्वांचे आभार मानले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक सिताराम गवस यांनी केले. या संपूर्ण कार्यक्रमासाठी प्रशालेचे ग्रंथपाल लीनेश धुरी यांनी विशेष मेहनत घेतली तसेच शारदा गावडे, आचल रावले, मारिया फर्नांडिस, विवेकानंद जोशी,  प्रणाली रेडकर, निलागी गवंडळकर, उर्मिला मीनिंजिस, दीप वारंग, गणेश डिचोलकर आदि शिक्षकांचे विशेष सहकार्य लाभले. संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा, पर्यवेक्षिका संध्या मुणगेकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी व पालक यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच पोलीस स्टेशन सावंतवाडी यांनी यावेळी ग्रंथदिंडी आयोजनासाठी विशेष सहकार्य केले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles