वेंगुर्ला : दिनांक 4 ऑक्टोबर 2025 रोजी शिरोडा, वेळागर येथील समुद्रात दुपारी 4:45 चे दरम्यान आठ पर्यटक बुडाल्याची घटना घडली होती. सदर घटनेत श्रीमती इसरा इम्रान कित्तूर वय वर्षे 17 राहणार लोंढा बेळगाव हिला वाचविण्यात यश आलेले असून प्रशासनामार्फत उर्वरित सात पर्यटकांचा शोध घेणे कामी राबविण्यात आलेल्या शोध मोहिमेत आढळलेल्या पर्यटकांची माहिती पुढील प्रमाणे.
दिनाक 3 ऑक्टोबर रोजी प्रशासनामार्फत राबविण्यात आलेल्या शोध व बचाव मोहिमेत आढळून आलेल्या पर्यटकांची माहिती.
1. श्रीमती नहीदा फरीन इरफान कीत्तूर, वय वर्षे 34 राहणार लोंढा बेळगाव शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे.
2. श्री इबाद इरफान कीत्तूर, वय वर्षे 13 राहणार लोंढा बेळगाव, शव विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे.
3. श्रीमती नमीरा आफताब अख्तर,वय वर्षे 16, राहणार अल्लावर, बेळगाव शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे
दिनांक 4- 10 – 2025 रोजी प्रशासनामार्फत राबविण्यात आलेल्या शोध व बचाव मोहिमेत आढळून आलेल्या पर्यटकांची माहिती पुढील प्रमाणे
1. श्री इकवान इम्रान कित्तूर , वय वर्षे 15 राहणार लोंढा बेळगाव शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे
2. श्री फरहान मोहम्मद मणियार, वय वर्ष 20 राहणार कुडाळ सिंधुदुर्ग शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे
दिनांक 5.10. 2025 रोजी प्रशासनामार्फत राबविण्यात आलेल्या शोध व बचाव मोहिमेत आढळून आलेल्या पर्यटकांची माहिती
1. श्री इरफान मोहम्मद इसाक कीत्तुर, वय वर्षे 36 राहणार लोंढा बेळगाव शवविच्छेदन करिता सदर मृतदेह ग्रामीण रुग्णालय वेंगुर्ला येथे पाठवण्यात आलेला आहे. शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येईल.
2. श्री जाकीर निसार मणियार वय वर्षे 13 राहणार कुडाळ सिंधुदुर्ग सदर पर्यटकाचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय वेंगुर्ला येथे पाठवण्यात आलेला आहे. शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येईल.
सदरची शोध मोहीम महसूल विभाग ,पोलीस विभाग,ग्राम विकास विभाग, मत्स्यव्यवसाय विभाग स्थानिक मच्छीमार व नागरिकांच्या मदतीने राबविण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासनामार्फत आवाहन –
1. समुद्रात भरती असताना कोणीही समुद्रात अंघोळीसाठी जाऊ नये
2. तीन ते सात ऑक्टोबर 2025 या काळात अरबी समुद्रात शक्ती नावाचे चक्रीवादळ क्रियाशील राहणार आहे त्यामुळे या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार असल्याने या कालावधी त पर्यटकांनी समुद्रात जाणे टाळावे.
3. पर्यटकांनी मद्यपान करून समुद्रात जाऊ नये.
4. समुद्रात आंघोळीसाठी जाताना महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांची विशेष काळजी घ्यावी.
5. स्थानिक नागरिकांना समुद्रातील उधाण, तेथील संभाव्य धोके यांची माहिती असते त्यामुळे स्थानिक नागरिकांकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे सर्व पर्यटकांनी गांभीर्याने पालन करावे.
6. समुद्रातील जलक्रीडेचा आनंद घेताना तसेच समुद्रात नौका विहार करताना लाइफ जॅकेट परिधान करावे.


