गोंडा : हिंदीत ‘साली आधी घरवाली’ अशी एक म्हण आहे. पण काही लोक असे असतात, जे या नात्याला कलंक लावण्यात कुठलीही कमतरता ठेवत नाहीत. उत्तर प्रदेशच्या गोंडामध्ये असच एक प्रकरण समोर आलय. एका युवतीचं आपल्याच भावोजीसोबत सूत जुळलं. दोघांच अफेअर सुरु झालं. दोघांनी प्लानिंग केलं आणि घरच्यांना फसवून पळून गेले. लुधियानाहून आपल्या भावासोबत यूपीच्या गोंडामध्ये आलेली युवती आपल्याच भावोजीसोबत पळून गेली. या घटनेनंतर युवतीच्या भावाने म्हणजे मेहुण्याने नगर कोतवाली पोलीस ठाण्यात भावोजी विरुद्ध तक्रार नोंदवलीय. हे प्रकरण खरगूपुर क्षेत्राच आहे.
पीडितेच्या भावाने पोलिसात नोंदवलेल्या तक्रारीत म्हटलं की, मागच्यावर्षी 30 नोव्हेंबर 2024 रोजी तो त्याच्या बहिणीसोबत लुधियानाहून गोंडा येथे आला होता. शनिवारी दोन वाजण्याच्या सुमारास दोघे रेल्वे स्टेशन जवळून जय नारायण चौकाच्या दिशेने चाललेले. त्यावेळी बहिण दुकानातून सामान घेण्याच्या बहाण्याने थांबली. भावाला बोलली, ‘तू इथेच थांब, मी आली.‘
कोणाशी काही संपर्क साधला नाही –
भावाच्या म्हणण्यानुसार, त्यावेळी दुसऱ्या बहिणीचा पती म्हणजे त्याचे भावोजी तिथे आले. बहिणीशी गोड, गोड बोलून तिला स्वत:सोबत पळवून घेऊन गेला. त्यानंतर दोघांनी आपापले मोबाइल फोन बंद केले. कोणाशी काही संपर्क साधला नाही. घटनेनंतर युवतीची शोधाशोध सुरु केली. पण काही शोध लागला नाही. त्यावेळी पीडितेच्या भावाने पोलिसात तक्रार नोंदवली.
पोलिसांनी काय पावलं उचलली?
नगर कोतवाली पोलिसांनी तक्रारीच्या आधारावर भावोजी विरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. प्रकरणाच गांभीर्य लक्षात घेऊन विशेष टीम बनवण्यात आल्याच पोलिसांनी सांगितलं. लवकरच मुलीला शोधून काढण्यात येईल. या घटनेनंतर स्थानिक पातळीवर चर्चा सुरु आहे. कुटुंबियांनी पोलिसांकडे तात्काळ कारवाईची मागणी केलीय. पोलीस मोबाइल लोकेशन आणि अन्य टेक्निकल माहितीच्या आधारे दोघांचा शोध घेत आहेत.


