सावंतवाडीत : भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एका न्यायालयीन कामकाजासाठी सावंतवाडी संस्थानात भेट दिली असता दि. 22 ऑक्टोबर 1932 रोजी राजापूर ते गोवा (पंचमहाल) हद्दीतील कार्यकर्त्यांची एक सभा आयोजित करण्यात आली होती.या घटनेला चालू वर्षी 93 वर्षे पूर्ण होत असल्याने या स्मृतींना उजाळा देण्यासाठी समता प्रेरणाभूमी संवर्धन समितीने “स्मृती विचार संवर्धन वक्तृत्व स्पर्धेचे” आयोजन केले आहे. या स्पर्धेत मोठ्या संख्येने स्पर्धकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन समितीच्या वतीने करणेत येत आहे.सदर स्पर्धा जिल्हास्तरीय खुली असून तीन गटात घेण्यात येणार आहे. १)लहान गट- पाचवी ते सातवी २) द्वितीय गट- इयत्ता आठवी ते दहावी ३) महाविद्यालयीन गट अशा तीन गटात या स्पर्धा होणार आहेत. लहान गटासाठी प्रथम क्रमांक रोख रु १०००/- द्वितीय रु ७००/- तृतीय-रु ५००/- तर द्वितीय गटासाठी, प्रथम क्रमांक रोख रु १५००/- द्वितीय रु १२००/-तृतीय रु १०००/- तर महाविद्यालयीन गटासाठी प्रथम क्रमांक रोख रु २०००/- द्वितीय रु १५००/- ,तृतीय रु १०००/- अशी रोख पारितोषिके,सन्मानचिन्हे, व प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.
स्पर्धेसाठी विषय खालील प्रमाणे आहेत.
गट क्रमांक एक- (इयत्ता पाचवी ते सातवी)
विषय –
१] डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपण
२] डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रातून आज आपण काय शिकावे?
३] असे शिकले बाबासाहेब अर्थात विद्यार्थी बाबासाहेब.
गट क्रमांक दुसरा -(इयत्ता आठवी ते दहावी )
विषय –
१] सामाजिक न्यायासाठी बाबासाहेबांनी केलेला सत्याग्रह
२] बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध, फुले आणि संत कबीर यांना गुरु का मानले?
३ ]भारतीय संविधानाचे महत्त्व.
गट क्रमांक तीन -खुला महाविद्यालयीन गट
विषय –
१] डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जातीअंताविषयीचे विचार .
२]डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सामाजिक क्रांतिकारी लढे
३] डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत स्त्रीमुक्ती चळवळ
४] डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती आणि मुक्तीच्या प्रेरणा.
सदरची स्पर्धा दि.२२ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०.०० ते दु.१.०० या वेळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती उद्यान (समता प्रेरणाभूमी) जेल नजीक सावंतवाडी येथे घेण्यात येणार आहे.
ही स्पर्धा जिल्ह्यातील स्पर्धकांसाठी खुली असून नाव नोंदणीसाठी दि. २० ऑक्टोबर २०२५ पर्यंत १) मोहन जाधव – 9423880153, २) विठ्ठल कदम – 9823048126 ३) शांताराम असनकर- 7350715713 या पदाधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क करावा, अशी विनंती प्रेरणाभूमीचे सचिव मोहन जाधव यांनी केली आहे .


