सावंतवाडी : लोकशाहीचा तिसरा मुख्य स्तंभ असलेल्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर सोमवारी भर न्यायालयात चप्पल फेक करणाऱ्या शर्मा नावाच्या व्यक्तीचा तीव्र निषेध सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फुले – शाहू- आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यातून केला जात आहे. या संदर्भात त्यानि प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, लोकशाहीचा तिसरा मुख्य स्तंभ असलेल्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यासमोर एक न्यायालयीन खटला सोमवारी सुरू असताना अॅड. शर्मा यांनी मुख्य न्यायमूर्तीवर बूट फेकण्याचा निंदनीय प्रकार केला आहे. या घटनेचा तीव्र निषेध संपूर्ण देशभर सुरू असून सिंधूदुर्ग जिल्ह्यातही या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त होत आहे. फुले – शाहू- आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून या संदर्भात समता प्रेरणाभूमी संवर्धन समिती चे सचिव मोहन जाधव, सेवानिवृत्त बौद्ध अधिकारी कर्मचारी संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत कदम, सचिव मिलिंद सरपे यांच्यासह अनेकांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. अशा विकृत वकिलाची सनद रद्द करून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
शिवाय याच निवेदनात लडाखचे पर्यावरणवादी कार्यकर्ते तथा गांधीवादी नेते सोनम वांगचुक यांना शासनाने बेकायदेशीर रित्या केलेल्या अटकेचा निषेधही त्यांनी केला आहे.


