Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली शाळेत संस्थापक अध्यक्ष पी. एफ. डाॅन्टस यांचा द्वितीय स्मृतिदिन साजरा!

आंबोली : दिनांक ८ ऑक्टोबर रोजी सहकाररत्न कै. पी.एफ.डॉन्टस यांचा द्वितीय स्मृतिदिन साजरा करण्यात आला. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांच्या पुण्य प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी डॉन्टस साहेबांच्या स्मृतींना उजाळा दिला.
कै. पी. एफ. डॉन्टस यांनी सहकार, शिक्षण,राजकारण, समाजकारण अशा सर्वच क्षेत्रात प्रभावशाली कार्य केले होते. त्यांनी स्थापन केलेल्या आजी-माजी सैनिकांची संघटना, सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली, सैनिक पतसंस्था, कॅथोलिक बँक, राज्य सरकारी कर्मचारी संघटना या सर्वच संस्था समर्थपणे साहेबांच्या कार्याचा स्मृतीगंध सर्वत्र पसरवत आहेत.
कार्यक्रमात मान्यवरांनी साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे प्रास्तविक श्री. एस.एन. पोतदार यांनी केले. तर विद्यार्थी अथर्व पालव याने साहेब आणि सैनिक स्कूल हे अमृततुल्य मिश्रण होते असे सांगितले. डाॅन्टस साहेबांचे पुत्र आणि सैनिक स्कूलचे सचिव मा. जाॅय डाॅन्टस यांनी साहेब हे व्हिजनरी व्यक्तिमत्व होते आणि त्यांनी पाहिलेली सर्व स्वप्नं साकार करणे, हे आपले सर्वांचे कर्तव्य असल्याचे सांगितले.

संस्था अध्यक्ष मा. सुनील राऊळ यांनी सांगितले की, साहेबांसोबत अनेक वर्ष काम करण्याचे भाग्य मला लाभले. संस्था स्थापनेपासून संस्थापक कोषाध्यक्ष म्हणून साहेबांसोबत अनेक वर्ष कार्यरत असल्यामुळे त्यांच्या स्वप्नांना, विचारांना अजून भव्यदिव्य करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहीन तसेच सैनिक स्कूलच्या प्रगतीसाठी पूर्णपणे प्रयत्नशील राहीन, असे त्यांनी सांगितले.
स्मृती दिन कार्यक्रमात सैनिक बँक चेअरमन बाबुराव कविटकर, माजी प्राचार्य एस.टी. गावडे, आयईसएलचे माजी अध्यक्ष सुभेदार शशिकांत गावडे यांनी देखील आपण आणि साहेब अशा आठवणींना उजाळा देत साहेबांच्या कार्याचा आढावा घेतला.
तसेच भारतीय हवाई दल (IAF) बुधवार दि. 8 ऑक्टोबर रोजी त्यांचा 93 वा ‘हवाई दल’ दिन साजरा करण्यात आला.याचे औचित्य साधत पी.एफ.डॉन्टस साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीच्या विद्यार्थ्यांनी हवाई दलातील विविध मॉडेल्स बनवली.
विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या अतिशय सुंदर प्रतिकृती बनवल्या. आणि सर्व विद्यार्थ्यांना भारतीय हवाई दलाबद्दल माहिती करून दिली. यामध्ये B 2 बाॅबर, रॅफल, सुरवोई 30 MKI, सुरवोई 57, एम. आय. जी. 21, एम.आय.जी. 29, स्पेसकॅट जग्वार अशा अतिशय दर्जेदार प्रतिकृती बनवल्या आणि त्या प्रतिकृतीची माहिती सर्वांना करून दिली. यामध्ये कॅ.प्रज्वल यादव, कॅ.वेदांत वातकर,कॅ.हर्ष वळंजू, कॅ.अर्णव कासार, कॅ. दुर्वेश कोटनाके, कॅ. सर्वेश गावडे कॅ.जयेश धुरी,कॅ. सिद्धांत देसाई,कॅ.रुद्र बर्वे, कॅ.अथर्व राठोड, कॅ.अमेय पवार,कॅ. अरमान कादिरी, कॅ.दत्ताराम शेलार यांनी सहभाग घेतला होता.
मा. पी.एफ. डाॅन्टस यांचा द्वितीय स्मृतिदिन कार्यक्रमास संस्था अध्यक्ष श्री. सुनील राऊळ, जाॅय डॉन्टस, ज्येष्ठ संचालक शिवाजी परब, सैनिक पतसंस्था चेअरमन बाबुराव कविटकर, सुभेदार शशिकांत गावडे, उप.मुख्य कार्यकारी अधिकारी सैनिक पतसंस्था प्रल्हाद तावडे, माजी प्राचार्य एस.टी. गावडे, कार्यालयीन सचिव श्री. दिपक राऊळ, प्राचार्य एन.डी. गावडे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प्राचार्य एन.डी. गावडे यांनी केले तर सूत्रसंचालन हंबीरराव आडकूरकर यांनी केले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles