सावंतवाडी : पालक सचिव तथा सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यात 11 ऑक्टोबर 2025 रोजी सावंतवाडी आणि बांदा येथील महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांना भेटी देणार आहेत.
यात शनिवार, दिनांक 11 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 9.30 वाजल्यापासून वीरेंद्र सिंह, हे सावंतवाडी येथील खालील कार्यालयांना भेट देऊन त्यांच्या कामकाजाचा आढावा घेतील. तसेच आवश्यक सूचना करणार आहे. उपविभागीय अधिकारी कार्यालय, सावंतवाडी, तहसीलदार कार्यालय, सावंतवाडी, पंचायत समिती, सावंतवाडी, उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी यानंतर ते बांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र या कार्यालयासही भेट देणार आहेत. वीरेंद्र सिंह यांचा दिनांक 09/10/2025 ते 11/10/2025 या कालावधीतील सिंधुदुर्ग जिल्हा दौरा हा प्रामुख्याने सार्वजनिक आरोग्य आणि जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे. सावंतवाडी येथील या भेटीदरम्यान ते स्थानिक प्रशासकीय यंत्रणा, आरोग्य सुविधा आणि विकास कामांचा सखोल आढावा घेतील. प्रशासकीय गतिमानता आणि आरोग्य सेवांचा दर्जा सुधारण्याच्या दृष्टीने त्यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरणार आहे.


