Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव जिल्हास्तरीय स्पर्धा कुडाळ येथे उत्साहात संपन्न! ; माध्यमिक शिक्षण विभाग आणि सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळातर्फे आयोजन. 

‘मानव कल्याणासाठी विज्ञान व तंत्रज्ञान’ या विषयाअंतर्गत नाटिकांचे दर्जेदार सादरीकरण.

कुडाळ : राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रविनगर नागपूर,विभागीय शिक्षण उपसंचालक,कोल्हापूर, माध्यमिक शिक्षण विभाग,सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव २०२५ ही जिल्हास्तरीय स्पर्धा मराठा सभागृह, कुडाळ येथे नुकतीच पार पडली.


यामध्ये जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून अव्वल ठरलेल्या एक अशा आठ शाळांच्या संघांचा सहभाग होता.जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी उत्कृष्ट व्यासपीठ मिळवून देण्याच्या हेतूने शिक्षण विभाग व सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाच्या यशस्वी प्रयत्नातून संपन्न झालेल्या या स्पर्धेचे उदघाटन माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांच्याहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत झाले याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे, माजी सचिव गुरुदास कुसगावकर,जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग काकतकर, सचिव प्रकाश कानूरकर,उपाध्यक्ष रघुनाथ कारेकर , जिल्हा संघटक सत्यपाल लाडगावकर, कोषाध्यक्ष राजाराम फर्जंद,संजय शेवाळे,रुपेश कर्पे, प्रिती सावंत अनंत साईल, चंद्रकांत चव्हाण,विलास राठोड,योगानंद सामंत,सतिशकुमार कर्ले,दर्शना सामंत तसेच जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संघटनांचे पदाधिकारी तसेच जिल्हा विज्ञान मंडळाचे पदाधिकारी,सदस्य , कुडाळ तालुका विज्ञान मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

स्पर्धेतील प्रत्येक संघातील विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक संकल्पना नाट्यरूपाने मांडत विकसित तंत्रज्ञानाचा मानवी जीवनात उपयोग याचा प्रभावी संदेश दिला. दीपप्रज्वनानाने सुरुवात झालेल्या या उदघाटन कार्यक्रमात कुडाळ हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी सुमधुर आवाजात स्वागतगीत व ईशस्तवन सादर केले. प्रास्ताविक पांडुरंग काकतकर यांनी केले. यावेळी शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांनी सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शक यांना शुभेच्छा दिल्या व कार्यक्रमाच्या नियोजनात महत्वपूर्ण जबाबदारी स्विकारल्याबद्दल जिल्हा विज्ञान मंडळाचे कौतुक केले. सूत्रसंचालन विद्यानंद पिळणकर आणि गिरीश गोसावी यांनी केले तर स्पर्धेचे परीक्षण रुपेश नेवगी, संतोष पवार आणि प्रदीप बर्डे यांनी केले.

स्पर्धेचा निकाल –
प्रथम, कुडाळ हायस्कूल, कुडाळ.

द्वितीय – मिलाग्रीस हायस्कूल, सावंतवाडी,

तृतीय – सौ. इदिराबाई दत्तात्रय वर्दम हायस्कूल, पोईप-विरण, मालवण.

उत्कृष्ट नायक – सचिन परब (पोईप हायस्कूल),

उत्कृष्ट नायिका – सावी मुद्राळे (कासार्डे हायस्कूल)

उत्कृष्ट दिग्दर्शक – गुरुप्रसाद शिरसाट (कुडाळ हायस्कूल)
उत्कृष्ट नेपथ्य – दत्ताराम नाईक, मिलाग्रीस हायस्कूल, सावंतवाडी .

‘यांचा’ झाला विशेष सन्मान –
या कार्यक्रमानिमित्त शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तिमत्त्वांचा सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळातर्फे शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांच्या हस्ते शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन विशेष सन्मान करण्यात आला यामध्ये मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे, क्रांतीज्योती पुरस्कार प्राप्त शिक्षक प्रकाश कानुरकर, शिक्षक भारती,राज्य कार्यवाह,संजय वेतुरेकर,जिल्हा मुख्याध्यापक संघ माजी सचिव गुरुदास कुसगावकर, मराठा महासंघ सिंधुदुर्ग अध्यक्ष, दिनेश म्हाडगुत, महाराष्ट्र राज्य काष्ट्राईब संघटना अध्यक्ष सुधीर तांबे, सिंधुदुर्ग काष्ट्राईब संघटना सचिव अभिजित जाधव, जिल्हा माध्यमिक पतपेढी, ओरोस अध्यक्ष सुरेंद्र लांबोरे, सिंधुदुर्ग जिल्हा गणित मंडळ अध्यक्ष प्रसाद कुबल, कुडाळ माध्यमिक पतपेढी अध्यक्ष विद्यानंद पिळणकर, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे सचिव गजानन नानचे, सिंधुदुर्ग प्रयोगशाळा संघटनेचे उपाध्यक्ष सूर्यकांत चव्हाण, मराठा हॉलचे मालक सुरेंद्र गवस यांचा समावेश होता. जिल्हा शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना दर्जेदार व्यासपीठ मिळवून देण्याच्या या विज्ञान मंडळाच्या उपक्रमांविषयी जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी समाधान व्यक्त केले असून त्यासाठी जिल्हापरिषकडून सर्वतोपरी सहकार्य मिळेल अशी ग्वाही दिली.स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सत्कारमूर्तींनी आर्थिक सहकार्य केले. बक्षिस वितरण दिनेश म्हाडगुत, सुरेन्द्र गवस व विज्ञान मंडळाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. आभार प्रदर्शन प्रिती सावंत यांनी केले.

ADVT –

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles