मुंबई : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नाटककार, कोकणचे सुपुत्र डॉ. अनिल जिजाबाई सरमळकर यांच्या जागतिक किर्ती प्राप्त ‘The Fox’ या इंग्रजी नाटकाची सप्तनाट्यधारा प्रकाशित होणार असून त्यामधील चौथे नाटक ‘The Last Filcker’ येत्या डिसेंबरमध्ये प्रकाशित होत आहे.
‘The Fox’ चार वर्षापूर्वी इंग्लंड येथील Matchword press या प्रख्यात प्रकाशन संस्थेने प्रकाशित केले असून या नाटकाची दखल मोठया प्रमाणात आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली.विशेषता अमेरिकन ब्रॉडवे थियेटर या जागतिक रंगभूमीवर या नाटकाची दखल घेतली गेल्यानंतर अमेरिकेतील प्रख्यात येल विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय नाट्य स्पर्धेत The fox चा अंतर्भाव करण्यात आला होता. तसेच अमेरिकेतील विश्वविख्यात कोलंबिया विद्यापीठाच्या नाट्यविभागाने द फॉक्स चे आपल्या नाट्य विभागात स्वागत केले आहे. जागतिक स्तरावरील रंगकर्मी, विचारवंत, समीक्षक इत्यादींनी या नाटकाचे प्रचंड कौतुक केले. तथापि नाटककार अनिल सरमळकर यांनी The fox ची त्रिनाट्यधारा प्रकाशित होइल असे जाहीर केले होते.

दरम्यान It’s Already Tomorrow ( इट्स ऑलरेडी टुमारो) हे या नाट्य धारेतील दुसरे नाटक 2023 मध्ये प्रकाशित झाले असुन या सिरीजमधील तिसरे नाटक Vulture Whisper प्रकाशना च्या वाटेवर आहे.
विशेषत The fox septology मधील नियोजित सात नाटकांमधील चौथे नाटक असणारे
The Last Flicker हे इंग्रजी नाटक आता प्रकाशित होत आहे.
यासंदर्भात बोलताना नाटककार डॉ. अनिल सरमळकर म्हणाले “The fox हे स्वतंत्र नाटक आहे व त्यानंतरच्या या सप्तनाट्यधारेतील प्रत्येक नाटक आशय शैली प्रायोगिकता इत्यादि बाबतीत स्वतंत्र नाटक असेल मात्र या अपेक्षित सर्व नाटकांमध्ये एक समान अंतस्वर असेल तो म्हणजे मानवी मनाचं होवु घातलेले ऊध्वस्तीकरण जनावरीकरण आणि नव्या युगाच्या भीषण पशुतेचा आराजकाचा युगात्मक विनाशाचा अटळ भेसूर भविष्यध्वनी आणि अर्थातच इतर कित्येक मानवी कंगोरे आणि अद्भुतरम्यता वास्तवता भयकारकता रहस्यमयता त्यामध्ये प्रतित झालेली असेल
कदाचित कोणत्याही भारतीय नाटकाराने आजवर आपल्या नाट्यलेखनात सेप्टॉलॉजी लिहिली नसावी. मला स्वताला The fox चा व्यापक पट जाणवला तेव्हा मी विचार केला की आपण सप्तनाट्य लिहुन हा मोठा कॅनव्हास जगासमोर मांडू शकतो त्यादृष्टीने एक प्रायोगिक प्रयत्न म्हणुन मी हे एक पाऊल टाकण्याचा प्रयत्न करत आहे असेही डॉ. अनिल सरमळकर म्हणाले.
दरम्यान डॉ. अनिल सरमळकर यांनी मराठी व इंग्रजीमधून प्रचंड लेखन केले असुन त्यांच्या आगामी अत्यंत महत्वाकांक्षी Enemy of America या पुस्तकाने संपूर्ण जागतिक साहित्य स्तरावर मोठी उत्सुकता निर्माण केली आहे.
येत्या डिसेंबर महिन्यात The Last Flicker मुंबई येथे प्रकाशित होत असुन Horizon publishing च्या वतीने हे नाटक प्रकाशित होत आहे.


