सावंतवाडी : म्हापण – चव्हाणवाडी येथील श्री शैलेश विष्णू किनवडेकर यांचा मुलगा कु. विनीत शैलेश किनवडेकर (वय वर्ष 18) हा गेले काही महिने कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त आहे. सध्या त्याच्यावर कोल्हापूर येथील ॲपल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्याच्या उपचारार्थ अॅड. गणेश प्रकाश चव्हाण यांच्या प्रयत्नातून भाजपा युवा नेते तथा यशस्वी उद्योजक विशाल परब आणि अँड. अनिल निरवडेकर या दोघांनीही उपचारासाठी आर्थिक मदत केलेली आहे
सदर रक्कम अॅड. अनिल निरवडेकर यांनी वडील शैलेश किनवडेकर यांच्याकडे सुपूर्त केली. यावेळी त्यांच्या समवेत प्रशांत चव्हाण, चंद्रकांत चव्हाण, महेश चव्हाण, दादु म्हापणकर, सागर चव्हाण आणि सर्वेश चव्हाण उपस्थित होते
दरम्यान या मदतीबद्दल श्री विशाल परब आणि अॅड. अनिल निरवडेकर यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत, अशी प्रतिक्रिया शैलेश किनवडेकर यांनी दिली.


