सिंधुदुर्ग : संपर्क फाऊंडेशन आणि जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने संपर्क स्मार्ट शाळा कार्यक्रमांतर्गत वेंगुर्ला तालुक्यातील केंद्रशाळा सुरंगपाणी शाळेला टॉप स्कूल ऑफ सिंधुदुर्ग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . मान जिल्हाधिकारी श्रीम तृप्ती धोडमिसे याच्या हस्ते हा पुरस्कार केंद्र मुख्याध्यापिका तथा स्मार्ट टीचर श्रीम. शामल मांजरेकर – पिळणकर यांनी स्विकारला.
यावेळी व्यासपीठावर माननीय शिक्षणाधिकारी श्री गणपती कमळकर साहेब, संपर्क फाउंडेशनच्या डेप्युटी स्टेट हेड मयुरी कुलकर्णी तसेच झोनल मॅनेजर श्री महेश होले तसेच सर्व तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख उपस्थित होते.
सुरंगपणी केंद्रशाळेला मिळालेल्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .


