सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालयातून १० डॉक्टर सोडून जाणं परवडणारं नाही. त्यांना थांबण्याची विनंती आम्ही केली आहे. शिवसेना त्यांच्यासोबत आहे, त्यांनी राजीनामे देऊ नये, असे आवाहन माजी नगराध्यक्षा अनारोजीन लोबो यांनी केले. तसेच सावंतवाडीच्या हॉस्पिटलचं नाव बदनाम करुन आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न काही जण करत नाही. काड्या घालण्याच काम ते करत असल्याचा आरोप विरोधकांवर त्यांनी केला. आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
लोबो म्हणाल्या, आज उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांची आम्ही भेट घेतली. रुग्णांशीही चर्चा केली. काल १० डॉक्टरांनी राजीनामे दिलेत. असलेले डॉक्टर जात असतील तर ते योग्य नाही, परवडणार नाही. सावंतवाडीच्या हॉस्पिटल नाव बदनाम करुन आपली पोळी भाजण्याचा काम काही जण करत आहे. डॉक्टरांची विनाकारण बदनामी होऊ नये, असं मत त्यांनी व्यक्त केले.
दरम्यान, आरोग्य मंत्र्यांकडे पालकमंत्री व स्थानिक आमदारांच्या माध्यमातून रिक्तपद भरण्यासाठी आम्ही निवेदन दिली होती. रुग्णालयाचे प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. काही प्रश्न मार्गी लागत आहेत. अत्याधुनिक सेवा उपजिल्हा रुग्णालयात आहेत. बऱ्याच रुग्णांना त्याचा फायदा मिळतो. दिवसाला ४०० रुग्ण ओपीडीचा लाभ घेतात. आजच्या या परिस्थितीत त्या रुग्णांना कुठे त्रास होऊ नये याचीही काळजी घ्यावी, असे आमदार प्रतिनिधी तथा रुग्ण कल्याण समितीचे सदस्य देव्या सुर्याजी यांनी सांगितले. यावेळी माजी नगराध्यक्षा अनारोजीन लोबो, शिवसेना शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, परिक्षीत मांजरेकर, भारती मोरे, दिपाली सावंत, शर्वरी धारगळकर, दीपक सावंत आदी उपस्थित होते.


