सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकणवासी आणि सिंधुदुर्ग जनसेवा प्रतिष्ठान पुणे यांच्यामार्फत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सावंतवाडी मतदारसंघ विधानसभा उपाध्यक्ष रविकिरण गवस यांना प्रत्यक्ष भेटून बऱ्याच जणांची निवेदने आली. याचा विचार करता गेल्या अनेक वर्षापासून कोकणवासिय पोट भरण्याकरीता पुण्यामध्ये आलेले आहेत. बहुसंख्य कोकणवासिय येरवडा, चंदननगर, विश्रांतवाडी, धानोरी, दिघी, चन्होली, आळंदी, भोसरी या भागामध्ये वास्तव्यास आहेत. जवळ ४ ते ५ हजार कोकणवासिय या भागात स्थायिक झालेले आहेत. जन्मगावी जाण्या-येण्याकरीता एसटी बसचा वापर करीत असतात. बऱ्याचशा एसटी गाड्या ह्या रात्रीच्या वेळी पुण्यामध्ये येत असतात. रात्री गाड्या पुण्यामध्ये आल्यानंतर जेवढे एसटी बसचे प्रवासभाडे आहे. त्याच्यापेक्षा जास्त पैसे रिक्षावाले उकळत असतात. तसेच अनेक बसेस पुणे स्टेशनवरून पुणे मुंबई (खडकीमार्गे) हायवेवरून वल्लभनगर डेपोला जातात. परंतु बरेचशे कोकणवासीय येरवडा, चंदननगर, विश्रांतवाडी, धानोरी, दिघी, चन्डोली, आळंदी, भोसरी या भागामध्ये राहतात. जर सदर बस पुणे स्टेशनवरून व्हाया येरवडा, विश्रांतवाडी, दिपी, भोसरी वल्लभनगरला जाईल आणि संध्याकाळी परत व्हाया भोसरी, दिषी, विश्रांतवाडी येरवडा, पुणे स्टेशन या मार्गाने सुरू झाल्यास या भागातील राहणाऱ्या कोकणवासियांची अडचण दूर हाईल.

दोडामार्ग हा तालुका आपण १९९९ साली निर्माण झाला आहे. या भागातून पुणेला येण्यासाठी बस नाही. तेथील चाकरमान्यांना बांदा किंवा सावंतवाडीला यावे लागते. तरी आपणांस विनंती आहे की आपण सदर मार्गाचा सर्व्हे करून दोडामार्ग सावंतवाडी (आंबोलीमार्ग) पुणे व्हाया विश्रांतवाडी, दिधी, भोसरी ही नवीन एसटी बस कायमस्वरूपी सुरू करावी ही आम्हां सिंधुदूर्गवासियांची कळकळीची विनंती आहे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सावंतवाडी विधानसभा उपाध्यक्ष रविकिरण गवस यांनी सावंतवाडी आगाराकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. यावेळी जनसेवा प्रतिष्ठान पुणे अध्यक्ष शेखर परब, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष योगेश कुबल उपस्थित होते.


