वेंगुर्ला : भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग आणि जय मानसीश्वर संघ, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने, युवानेते तथा यशस्वी उद्योजक विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य खुल्या व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा शुक्रवार व शनिवार, दि. 17 व 18 ऑक्टोबर 2025 रोजी वेंगुर्ला येथील कॅम्प व्हॉलीबॉल मैदानावर पार पडणार आहे.
स्पर्धेसाठी विजेत्या संघांना आकर्षक पारितोषिके देण्यात येणार असून प्रथम पारितोषिक 30,000/ रुपये व चषक, द्वितीय पारितोषिक 20,000/ रुपये व चषक, तसेच तृतीय व चतुर्थ पारितोषिक प्रत्येकी 7,000/ रुपये व चषक असे ठेवण्यात आले आहे. याशिवाय बेस्ट अटॅकर, बेस्ट सेट्टर, बेस्ट लिबेरो आणि ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ या वैयक्तिक पुरस्कारांद्वारे खेळाडूंचा गौरव होणार आहे.
संघ नोंदणीसाठी अंतिम तारीख 16 ऑक्टोबर 2025 निश्चित करण्यात आली असून सामने सायंकाळी 6 वाजल्यापासून सुरू होतील. पंचांचा निर्णय अंतिम राहील, अशी माहिती आयोजकांनी दिली.


