दोडामार्ग : यंदा खास दिवाळीनिमित्त दोडामार्ग तालुका मर्यादित नरकासुर स्पर्धेचे बाबा टोपले मित्र मंडळाच्या वतीने १९ रोजी रात्रौ ठीक ७ ते ९ वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा बाबा टोपले यांच्या निवासस्थानी होणार असून या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्यांनी नागेश टोपले 7083358942 यांच्याशी १७ तारीख संध्याकाळी ५ वाजेपर्यंत संपर्क करण्याचे आवाहन बाबा टोपले मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
भरघोस बक्षिसे –
या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ८०००/ रु , द्वितीय पारितोषिक ५०००/रु , तृतीय पारितोषिक ३०००/ तर उत्तेजनार्थ २०००/ अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहे. तरी तालुक्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन बाबा टोपले मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.


