कणकवली : तालुक्यातील फोंडाघाट, बाविचे भाटले येथील एका 25 वर्षीय युवक संकेत शांताराम चौगुले याने विवाहितेचा विनयभंग केला असले प्रकरणी त्याला कणकवली पोलिसांनी अटक केली. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
सदर घटना 9 ऑक्टोबर रोजी सकाळी घडली होती. दरम्यान पीडित विवाहिता आपल्या मुलांना शाळेत सोडून घरी येत होती. ह्याचवेळी संशयित संकेत चौगुले याने तिचा विनयभंग केला, अशी फिर्याद सदर विवाहितेने पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार संशयतास 9 ऑक्टोबर रोजी पोलिसांनी अटक केली. न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्याचा आदेश दिला असून याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वृषाली बर्गे करीत आहेत.


