सावंतवाडी : आज बुधवार दिनांक १५ ऑक्टोबर.! भाजपा युवा नेते यांचा वाढदिवस! – त्यानिमित्ताने त्यांना आमच्याकडून हृदयापासून शुभकामना!ब
आपल्या वाढदिनानिमित्त युवा नेते विशाल परब यांनी व्यक्त केलेल्या ‘ह्या’ संवेदनशील भावना_
मित्रहो, आज माझा वाढदिवस.. जो विविध सामाजिक सेवा उपक्रमांनी साजरा होतोय.
भारतीय जनता पार्टी तर्फे आयोजित सर्व सेवाभावी उपक्रमांना आपली सर्वांची उपस्थिती प्रार्थनिय आहे आणि त्यारूपाने आपले आशीर्वाद माझ्यासाठी संस्मरणीय आहेत.
आपणास कल्पना आहे की महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून मराठवाड्यातील पुरग्रस्त शेतकरी असो किंवा कोकणातील आरोग्याच्या समस्या असणारी गोरगरीब जनता अशा महाराष्ट्रभरातील सर्वांनाच अडचणीच्या वेळी मदत होत असते.
माझे सर्वांना कळकळीचे आवाहन आहे, माझ्या वाढदिवसानिमित्त कोणीही हारतुरे, पुष्पगुच्छ, केक किंवा भेटवस्तू आणू नयेत. त्याऐवजी आपण सर्वजणच सामाजिक बांधिलकी जपूया आणि अशा खर्चाऐवजी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधीस यथाशक्ती मदत आपला सहयोग देऊया!
आपले सर्वांचे निरंतर प्रेम आणि शुभाशीर्वाद हीच माझ्या आयुष्यात मी कमावलेली पुंजी आहे, ज्याचे मला नेहमीच मनोमन समाधान आहे.
- सदैव आपलाच ऋणांकीत –
विशाल प्रभाकर परब
युवा नेता, भाजपा महाराष्ट्र


