सावंतवाडी : भारतीय जनता पार्टीचे युवा नेते तथा यशस्वी युवा उद्योजक विशाल परब यांना भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा युवा खासदार तेजस्वी सूर्या यांनी वाढदिनी हटके शुभेच्छा पाठवल्या आहेत. खासदार तेजस्वी सूर्या यांनी ग्रीटिंग कार्ड पाठवत –
प्रिय विशाल परब-
”पश्येम शरदः शतम! जीवेम शरदः शतम!
मोदाम शरदः शतम! अजितश्याम शरदः शतम!!”
अशा आशयाने युवा नेते विशाल परब यांचे वाढदिनी अभीष्टचिंतन केले असून त्यांच्या यशासाठी ईश्वराकडे मनस्वी प्रार्थना देखील केली आहे.
दरम्यान युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार तेजस्वी सूर्या यांच्या या हटके शुभेच्छांबद्दल युवा नेते विशाल परब यांनी देखील त्यांचे आभार मानले आहेत.


