Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

राज्यातील तब्बल ८ हजार पत्रकार आणि ११ हजार कुटुंबीयांचा विमा काढला! ; ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चा अभिनव उपक्रम.

  • पत्रकार यांच्याशी संबंधित १८ हजार जणांची आरोग्य तपासणी. 
  • मुंबई : राज्यातील पत्रकारांच्या हितासाठी काम करणाऱ्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’ने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. संस्थेने मागील तीन महिन्यांत राज्यभरातील तब्बल ८ हजार पत्रकार आणि त्यांच्या ११ हजार पत्रकार कुटुंबीयांचा आरोग्यविमा काढून पत्रकार सुरक्षेच्या दृष्टीने एक नवा आदर्श निर्माण केला आहे. यासोबत पत्रकार यांच्याशी १८ हजार जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.
    व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’च्या पंचसूत्रीमध्ये पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयाचे आरोग्य हा महत्वपूर्ण विषय आहे. पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नियमित आरोग्य तपासणीसह गंभीर आजार, मोठ्या शस्त्रक्रिया आणि आपत्कालीन परिस्थितीत मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कामगिरीबाबत आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी सांगितले की, “व्हॉईस ऑफ मीडियाच्या सदस्य असणाऱ्या प्रत्येक पत्रकाराला आम्ही राज्यभरात मोफत आरोग्य सेवा देत आहोत. त्यांच्या परिवारातील प्रत्येक सदस्याला कोणत्याही मोठ्या दवाखान्यात आवश्यक ते उपचार मिळतील, याची आम्ही जबाबदारी घेतली आहे.”
  • डॉ. शेटे पुढे म्हणाले की, “मागील दोन वर्षांत आम्ही पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्य सेवेसाठी १० कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट रुग्णालयांच्या खात्यात जमा केली आहे. त्यातून पत्रकारांचे उपचार, औषधोपचार आणि आवश्यक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत.”
    या उपक्रमात प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, महासचिव दिगंबर महाले, कार्याध्यक्ष विजय चोरडिया, मंगेश खाटीक, उपाध्यक्ष अजितदादा कुंकूलोळ, सर्व विंगचे प्रमुख अमोल मतकर तसेच कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी आणि जिल्हा–तालुका स्तरावरील समन्वयकांनी विशेष पुढाकार घेतला. राज्यातील विविध ठिकाणी आरोग्य कॅम्प आयोजित करण्यात आले. अनेक पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांना याचा थेट लाभ मिळाल्याचे उदाहरणे राज्यभर दिसून आली आहेत.
    मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्य कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले की, “व्हॉईस ऑफ मीडियाच्या शिफारशीवरून दररोज ५ ते ६ पत्रकारांच्या आरोग्य प्रकरणांचा आम्ही निपटारा करतो. पत्रकार ही सामाजिक संपत्ती आहे, त्यांचे आरोग्य आणि सुरक्षा हे आमचे प्राधान्य आहे.”
    या विमा उपक्रमात भारतीय पोस्ट विभागानेही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या संदर्भात पोस्ट विभागाचे वरिष्ठ अधिकारी संजीव भरद्वाज यांनी सांगितले की, “एखाद्या संस्थेने इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्या पदाधिकारी आणि सदस्यांचा विमा काढणे ही पहिलीच घटना आहे. आम्हाला अभिमान आहे की ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने सामाजिक जबाबदारीचा आदर्श निर्माण केला आहे.”
    आरोग्य विंगचे प्रमुख भीमेश मुतुला यांनी माहिती दिली की, “मोठ्या आजारांचे लवकर निदान करून त्यावर उपचार सुरू करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. पुढील महिन्यात राज्यातील २३० तालुक्यांमध्ये आरोग्य कॅम्प आयोजित केले जातील.” यात पत्रकारांशी संबंधित सहा हजारावून अधिक जणांची तपासणी होईल.
    ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’च्या या उपक्रमामुळे राज्यातील हजारो पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षिततेचा आणि आरोग्यसेवेचा मजबूत आधार मिळाला आहे. पत्रकारांच्या सामाजिक सुरक्षा आणि सन्मानासाठीचा हा उपक्रम निश्चितच एक आदर्श सामाजिक क्रांती ठरत आहे. आरोग्य तपासणी, विमा, मोठ्या आजारावर उपचार, आगामी काळात करण्यात येणारे कॅम्प, यासाठी सर्व टीमने घेतलेला पुढाकार महत्वपूर्ण आहे, या सर्व टीम ला, सर्व मदत करणाऱ्या शासकीय टीमला, अधिकारी, प्रमुख यांना ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’चे संस्थापक, अध्यक्ष, संदीप काळे, कार्याध्यक्ष संजय आवटे, सरचिटणीस चंद्रमोहन पुपाला, दिव्या भोसले, कोषाध्यक्ष चेतन बंडेवार, संघटक अशोक वानखडे, कार्यवाहक शंतनू डोईफोडे यांनी शुभेच्या दिल्या आहेत.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles