कुडाळ : तालुक्यातील महादेवाचे केरवडे गावातील केरवडे कार्याद नारूर नं. १ शाळेला युवा उद्योजक अक्षय केसरकर यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत वीस हजार किमतीचा कलर प्रिंटर प्रदान केला. यानिमित्त शाळेत छोटेखानी प्रिंटर प्रदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नंदकिशोर परब होते त्यांनी केसरकर कुटुंबांचे गावातील सहकार्य समाजकार्य याबाबत गौरोद्गार काढले.
तसेच गावाचे सरपंच प्राची परब यांनी त्यांच्या या समाजकार्य व दातृत्वा बाबत ग्रामपंचायत करवडे मार्फत आभारपत्र प्रदान केले. यावेळी व्यासपीठावर माजी सरपंच पंढरीनाथ परब, हळदीची नेरुर केंद्राचे केंद्रप्रमुख चंद्रकांत धुरी यांनी त्यांच्या या समाजकार्याला शुभेच्छा दिल्या. तसेच प्रिंटर साठी ज्यांनी आव्हान केले ते याशाळेचे माजी विद्यार्थी शिक्षकनेते गणेश नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शाळेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी माजी विद्यार्थ्यां मार्फत प्रयत्नशील राहणार असे सांगितले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक गुंजाळ सर यांनी शाळेच्या वतीने भावी आयुष्यासाठी व समाज कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच शाळा केरवडे नं १ मार्फत अक्षय केसरकर यांना शाल श्रीफळ व आभारपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले. यावेळी त्यांच्या पत्नी आणि वडील शंकर केसरकर उपस्थित होते. अक्षय केसरकर यांनी आपले पुढे शाळेसाठी सहकार्य राहील अशी ग्वाही दिली.
कार्यक्रमाला पालक, शिक्षक, अंगणवाडी कर्मचारी, माजी विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी उपस्थित सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.


