दोडामार्ग : तालुक्यातील भेडशी – खालचा बाजार येथील रहिवासी, बँक ऑफ इंडिया शाखा – साटेली भेडशी येथील सेवानिवृत्त कर्मचारी बाबुराव गणू पार्सेकर (वय ७२) यांचे काल शनिवारी सकाळी बांबोळी – गोवा येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले.
बाबुराव पार्सेकर यांचा भेडशी गावाच्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यात सातत्याने सहभाग असायचा. येथील शिमगोत्सवात आयोजित करण्यात येणाऱ्या नाटकांमध्ये त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. ते बँक ऑफ इंडिया शाखा साटेली – भेडशी येथून काही वर्षांपूर्वीच निवृत्त झाले होते. त्यानंतर ते आपल्या भेडशी येथे घरी राहत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, सुना, नातवंडे, भाऊ, भावजय, पुतण्या असा मोठा परिवार आहे. सावंतवाडी येथील अटल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते ॲड. नकुल पार्सेकर यांचे ते ज्येष्ठ बंधू होत.


