सावंतवाडी : बँक ऑफ इंडियाच्या ओटवणे शाखेच्यावतीने ओटवणे येथील रवळनाथ विद्यामंदिरच्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. बँक ऑफ इंडियाच्या स्टार बाँडिंग उपक्रमाअंतर्गत या शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
यावेळी बँकेचे ओटवणे शाखा व्यवस्थापक लक्ष्मण बोधवड यांनी लवकरच दिवाळीनंतर गावातील सर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण करण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक राजेंद्र देसाई यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण केल्याबद्दल बँक ऑफ इंडियाचे आभार मानले. यावेळी बँकेचे कर्मचारी सुधाकर बुराण, ओटवणे हायस्कूलच्या शिक्षिका संजिवनी गवस, शिक्षक एकनाथ घोंगडे, एन व्हि राऊळ, पी एम कांबळे, लिपिक शंकर बिरोडकर, कर्मचारी मंगेश गावकर, शरद जाधव, महादेव खेडेकर, मधुकर खरवत आदी उपस्थित होते.
ओटवणे प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप. ; बँक ऑफ इंडियाच्या स्टार बाँडिंग उपक्रमाअंतर्गत वितरण.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


