सावंतवाडी : ‘आम्ही सावंतवाडीकर मित्र मंडळ’ आयोजित ‘नरकासुर स्पर्धा २०२५’. मोठ्या उत्साहात पार पडली. खुला गट व बालगट या दोन्ही गटात शेकडो स्पर्धक सहभागी झाले होते. सावंतवाडीतील शिवरामराजे भोसले पुतळा चौक ते सारस्वत बँके पर्यंतच्या मार्गावर मोठ्या उत्साहात सुरू असलेल्या या स्पर्धेला युवा नेते विशाल परब यांनी सपत्नीक भेट दिली. सौ. वेदिका विशाल परब व विशाल परब यांनी सहभागी स्पर्धकांच्या वेशभूषा आणि कलेचं कौतुक केलं.

या स्पर्धा पाहण्यासाठी सावंतवाडीकर हजारोंच्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, सावंतवाडी मंडल अध्यक्ष सुधीर आडीवरेकर, जिल्हा परिषद सदस्य विनोद राऊळ, सोशल मिडिया प्रमुख केतन आजगावकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्न उर्फ बाळू देसाई, (जि. का. सदस्य) सुहास गवंडळकर, तालुका अध्यक्ष बाळू देसाई, अमित परब, दिलीप भालेकर, सौ. दिपाली भालेकर, सौ. मोहिनी मडगांवकर, सुकन्या टोपले यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.


