सावंतवाडी : शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख तथा सावंतवाडी नगरीचे माजी नगराध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजू परब यांनी आज लक्ष्मीपूजनाच्या आणि दीपावलीच्या निमित्ताने शहरातील विविध मान्यवरांच्या तसेच सामान्य नागरिकांच्या गाठीभेटी घेत तसेच विविध व्यापारी वर्गांना दुकानावर जाऊन प्रत्यक्ष शुभेच्छा दिल्या.

यावेळी त्यांनी सावंतवाडी शहरातील आणि तमाम सिंधुदुर्गवासियांना माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायमस्वरूपी लाभो अशी हृदयापासून प्रार्थना केली. यावेळी त्यांच्यासमवेत शिवसेनेचे सचिव परीक्षित मांजरेकर व इतर शिवसेना पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.


