मुंबई : गेली दहावर्षे सातत्याने कोकण कट्टा संस्था सामाजिक सेवेचे भान लक्षात घेऊन विलेपार्ले येथील पारशिवाडा स्मशान भूमीत दीपावलीच्या पहिल्या दिवशी येथील सर्व कामगार बांधवाना दिवाळी फराळ व भेटवस्तू देऊन शुभेच्छा देत असते..यंदाचे हे दहावे वर्ष आहे.
तेथील लिपिक श्री निलेश तेंडुलकर, श्री. माने, श्री. आसवले व मोडक गुरुजी हे नेहमी उपस्थित कोकण कट्टा सदस्यांचे मनापासून स्वागत करत असतात मुंबईतील हा आगळा वेगळा उपक्रम सुरु ठेवण्यासाठी कोकण कट्टा संस्थापक अजित पितळे, नितीन कुलकर्णी, दादा गावडे, दिपेश सावंत, सुनिल वनकुंद्रे, सुजीत कदम, विवेक वैद्य, बंडू डिके, प्रथमेश पवार यशस्वी प्रयत्न करुन उपस्थित राहतात.

स्मशानातील ही दिवाळी भेट आणि शुभेच्छा देण्याच्या या कार्यक्रमाचे कौतुक अनेक मनपा स्मशान भूमितील कर्मचारी करत असतात कोकण कट्टासंस्थेची सदस्यांचा भाऊबीज भेट या उपक्रमाला येथील कर्मचाऱ्यांनी हि साड्या देऊन सेवेत सहभाग घेतला निरोप घेताना सर्वांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसून येते होता…कोकण कट्टा सदस्य या उपक्रमा नंतर भाताणे येथील साईआधार संस्थेच्या निराधार मुलांना दिवाळी फराळाची भेट देण्यासाठी प्रस्थान केले.


