Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

तुमच्याकडील सोने विकून टाका! ; सचिन तेंडुलकरांनी का दिला असा सल्ला?

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने सर्वांनाच धक्का देणारा आर्थिक सल्ला दिला आहे. टाटा समूहाच्या तनिष्क ही ज्वेलरी कंपनी आहे. तिच्या जाहिरातीत सचिन लोकांना म्हणतोय की तुमचे जुने सोने विक्री करून नवीन दागदागिने खरेदी करा. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था मजबूत होईल. सचिन तेंडुलकरने या जाहिरातीत एक महत्त्वाची गोष्ट नमूद केली आहे. त्याच्या मते भारत जवळपास सर्वच सोने हे परदेशातून आयात करतो. त्यामुळे देशाच्या गंगाजळीवर त्याचा परिणाम होतो. आपण जर आपले जुने सोने हस्तांतरीत केले. एक्सचेंज केले. तर सोने आयात करण्याची गरज पडणार नाही. देश मजबूत स्थिती येईल. हा त्याचा संदेश केवळ क्रिकेट चाहत्यांसाठीच नाही तर सोने खरेदी करणारे आणि अर्थतज्ज्ञांसाठी सुद्धा आहे.

सचिनचे वक्तव्य किती योग्य?

भारत दरवर्षी सोन्याची मोठी आयात करतो. त्यामुळे भारताची व्यापारी तूट वाढते. म्हणजे जितकी परदेशी गंगाजळी भारतात येते. त्यापेक्षा अधिक रुपये हे सोने खरेदीसाठी खर्च करावे लागतात. यामुळे भारतीय रुपया कमकुवत होत आहे. तर आयात करण्यात येणाऱ्या वस्तू महागल्या आहेत.

सोने भारतीयांचे जीव की प्राण –

भारतात सोने हे केवळ दागदागिने नाहीत. तर त्यासोबत भारतीयांचे भावनिक नाते जोडल्या गेले आहेत. वर्ल्ड गोल्ड काऊंसिलनुसार, 2024 मध्ये चीनने 857 टन आणि भारताने 803 टन सोने जगभरातून खरेदी केले. जगभरातील सोन्याचे हे दोन सर्वात मोठे आयातदार आहेत. तर मॉर्गन स्टेनली नुसार, जून 2025 पर्यंत भारतीय कुटुंबांकडे जवळपास 34,600 टन सोने होते. त्याची किंमत जवळपास 320 लाख कोटी रुपये इतकी मोठी आहे. हा भारताच्या सकल उत्पादनाच्या जवळपास 89 टक्के आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles