सावंतवाडी : आज सावंतवाडीत लक्ष दिव्यांनी उजळणाऱ्या ‘दीपोत्सवाचा’ आनंद द्विगुणीत व्हावा या उद्देशाने ‘भारतीय जनता पार्टीच्या’ वतीने भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या अभिनव संकल्पनेतून ‘अभंग रिपोस्ट’ या भक्ती – संगीतमय कार्यक्रमाने दिवाळीची सायंकाळ सजणार आहे. सायंकाळी ८:०० वा. जनरल जगन्नाथराव भोसले उद्यान, सावंतवाडी येथे रसिकांनी ही मेजवानी मिळणार आहे.
तेजोमय दिपावलीचे स्वागत दिव्यांनी होताना त्याला ‘भक्तीसुरांचा” साज चढणार आहे. भक्ती-संगीतमय दिवाळीची संध्याकाळ अनुभवण्यासाठी आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनिय आहे, असे भावनिक आवाहन भाजपा युवा नेते विशाल प्रभाकर परब यांनी केले आहे.


