सावंतवाडी : भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र राज्याचे युवा नेते विशाल परब यांनी आगामी ‘अभंग रीपोस्ट’ या कार्यक्रमाचा नुकताच पूर्व आढावा घेतला. या आढावा बैठकीला भारतीय जनता पार्टीचे अनेक महत्त्वाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘अभंग रिपोस्ट’ हा उपक्रम सांस्कृतिक आणि सामाजिक पातळीवर महत्त्वाचा ठरणार असून, या कार्यक्रमाच्या तयारीचा सविस्तर आढावा विशाल परब यांनी घेतला. कार्यक्रमाची रूपरेषा, कार्यकर्त्यांची भूमिका आणि आवश्यक व्यवस्थापन यासंबंधी परब यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना विशाल परब म्हणाले की, “‘अभंग रिपोस्ट’च्या माध्यमातून आपण संत साहित्याचा आणि अभंगांचा वारसा नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणार आहोत. या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेणे गरजेचे आहे.”

या बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पूर्ण ताकदीने काम करण्याची ग्वाही दिली. विशाल परब यांनी केलेल्या नियोजनामुळे ‘अभंग रीपोस्ट’ कार्यक्रम निश्चितच यशस्वी होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.


