- रुपेश पाटील.
सावंतवाडी : “हिम्मत असेल तर भाजपाचे पदाधिकारी फोडून दाखवा!”, असे आव्हान मित्र पक्ष भाजपाने दिले होते. हे आव्हान शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी लीलया स्वीकारले, असं दिसतं. कारण आज सावंतवाडी शहराचे भाजपा माजी शहर मंडल अध्यक्ष तथा जिल्हा कार्यकारिणी सदस्य अजय गोंदावळे यांनी आपल्या तब्बल 40 कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसह भाजपाला सोडचिठ्ठी देत संजू परब यांच्या नेतृत्वाखाली व सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.
“आपण गेली साडेचार वर्ष प्रामाणिक काम केले. मात्र हल्लीच्या भारतीय जनता पार्टीत बाहेरच्या लोकांचे जास्त ऐकले जाते. भाजपा शहराच्या वातावरणात अंतर्गत धुसमुस असल्यामुळे तसेच योग्य वागणूक न दिल्यामुळे आपण शिवसेनेत प्रवेश करत आहोत’, असे श्री. गोंदावळे यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान सावंतवाडी शहराध्यक्ष बाबू कुडतरकर यांनी अजय गोंदावळे व पक्ष प्रवेश केलेल्या तमाम कार्यकर्त्यांचे शिवसेनेतर्फे स्वागत केले व या सर्वांना पुढील आठ दिवसात योग्य ती जबाबदारी देऊन संघटन अधिकाधिक बळकट केले जाईल, असे सांगितले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब म्हणाले, भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष अजय गोंदावळे हे नाराज होते. त्यांच्या नाराजीचा फायदा उचलून कदाचित ते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत जाण्यापेक्षा त्यांनी आमच्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वात काम करावं, अशी आपण त्यांना साद घातली. त्यांनीही मोठ्या मनाने आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह आज आमच्या पक्षात प्रवेश केला, त्याबद्दल त्यांचे स्वागत आहे. आगामी काळात त्यांचा योग्य तो मानसन्मान करून सन्मानपूर्वक पदे देखील दिली जातील, अशी ग्वाही दिली.
या पक्षप्रवेशाच्या वेळी जिल्हाप्रमुख संजू परब, शहर प्रमुख बाबू कुडतरकर, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, जिल्हा सचिव परीक्षित मांजरेकर, महिला शहर प्रमुख भारती मोरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख झेवियर फर्नांडिस, युवा सेना विधानसभा प्रमुख अर्चित पोकळे, युवा सेना तालुकाप्रमुख क्लेटस फर्नांडिस, युवासेना शहराध्यक्ष निखिल सावंत, गजानन नाटेकर, विनोद सावंत, महादेव राऊळ, शशिकांत गावडे, विनायक म्हाडेश्वर यांसह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘ह्यांनी’ घेतला हाती शिवधनुष्य –
दरम्यान यावेळी भारतीय जनता पार्टीचे माजी शहर मंडल अध्यक्ष तथा जिल्हा कार्यकारिणी सदस्य अजय वसंत गोंदावळे. सौ. शीतल अजय गोंदावळे, भाजपा शहर सचिव व माजी शक्ती केंद्रप्रमुख मंदार पिळणकर, बूथ अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटकर, श्याम रेमुळकर, गणेश कुडव, जॉनी डिसोजा, नीलांग सावंत, संजय वरेकर, राज वरेकर (युवा मोर्चा शहराध्यक्ष), अमेय मडगावकर (युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष), मिथिलेश विजय सुकी, क्रिश सावंत, शंकर तारी, सरफराज शेख, संतोष मठकर, नेविस परेरा, मानेश्वर चौगुले, रोजीता डिसोजा, अजिंक्यराज गोंदावळे, प्रफुल्ल गोंदावळे, रोहन गोंदावळे, संजय जाधव, अखिल मांजरेकर, संदेश नेवगी, प्रथमेश बांदेकर, रुद्राक्ष भोसले (युवा मोर्चा सरचिटणीस), सदानंद कदम, अमर धोत्रे, राम गावडे, देवा चव्हाण यांनी शिंदे सेनेत प्रवेश घेतला.


