सावंतवाडी : शिवसेना जिल्हाप्रमुख सच्चिदानंद उर्फ संजू परब यांचे दिवाळीनंतरही पक्षप्रवेशांचे धमाक्यांवर धमाके सुरूच आहेत.
आज सायंकाळी बांदा येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेतील युवा तालुकाप्रमुख रियाज खान यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह उभा ठेवला सोडचिठ्ठी देत शिंदे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी त्यांचे शिंदे सेनेत स्वागत करत प्रत्येकाच्या सुखदुःखाचे काळजी आपण नक्की घेऊ व पक्ष प्रवेश केलेला प्रत्येकाचा योग्य आदर आणि सन्मान केला जाईल, असे अभिवचन दिले.

यावेळी महिला आघाडी जिल्हाप्रमुख ॲड. नीता सावंत कविटकर, जिल्हा सचिव परीक्षित मांजरेकर, उपजिल्हाप्रमुख झेवियर फर्नांडिस, उपतालुकाप्रमुख राकेश पवार, युवासेना तालुकाप्रमुख क्लेटस फर्नांडिस, तालुका संघटक गुरुनाथ सावंत, बांदा शहर प्रमुख ज्ञानेश्वर सावंत यांसह अन्य उपस्थित होते.


