सावंतवाडी : सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानची परंपरा कायम राखत सिंधुदुर्ग विभाग ता. सावंतवाडीच्या दुर्गसेवकांनी यावर्षी देखील 100 पणत्या लावून शिवस्मारक नेमळे येथे पहिला दिवा आपल्या राजांना समर्पित केला. यावेळी प्रेरणा मंत्र, घोषणा, ध्येय मंत्र, शिवभक्ती गीत म्हणत दुर्गसेवक, आणि ग्रामस्थ यांनी दीपोत्सवासह शिव विचारांचा जागर केला.
यावेळी एकनाथ गुरव, दिनेश सावंत, सुनील राऊळ, सुधीर राऊळ, शुभम नाईक, आनंद राऊळ, सिध्देश धुरी, सावळाराम देवळी, किसन नेमळेकर आदी दुर्गसेवक ग्रामस्थ उपस्थित होते.


