Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

प्रा. रूपेश पाटील यांना ‘ग्रेट महाराष्ट्रीयन पत्रकारिता पुरस्कार’ प्रदान! ; अभिनेते संजय मोहिते यांच्या हस्ते झाला सन्मान! ; कोल्हापुरात रंगला ‘मराठी पाऊल पडते पुढे’ गौरवगाथा सन्मान सोहळा!

सावंतवाडी : येथील सुप्रसिद्ध व्याख्याते, निवेदक तथा पत्रकार प्रा. रुपेश पाटील यांना रविवारी कोल्हापूर येथे अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक संजय मोहिते यांच्या हस्ते ‘द ग्रेट महाराष्ट्रीयन पत्रकारिता पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.

येथील राजर्षी शाहू महाराज नाट्यगृहात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्ताने आयोजित ‘मराठी पाऊल पडते पुढे’ – गौरवगाथा सन्मान सोहळा, कोल्हापूर – २०२५’ अंतर्गत हा मानाचा पुरस्कार प्रा. पाटील यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

यावेळी प्रा. रुपेश पाटील यांचा सन्मान अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते संजय मोहिते, ‘विसावा’ आश्रम पुणेच्या संस्थापिका सौ. स्वाती तरडे, बलुतेदार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष यशववंत शेळके, गोव्याचे सुप्रसिद्ध रंगकर्मी भालचंद्र उसगावकर, इचलकरंजी येथील सामाजिक कार्यकर्त्या डॉ. रजनी शिंदे, डॉ. बी. एन. खरात यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

प्रा. रुपेश पाटील यांना यापूर्वी महाराष्ट्र शासनाचा ‘राज्य आदर्श युवा पुरस्कार’, महाराष्ट्र शासनाचा ‘मुख्यमंत्री सोशल मीडिया महामित्र पुरस्कार’ यांसह इतर अनेक पुरस्कार प्राप्त आहेत. शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक आणि पत्रकारिता अशा विविध क्षेत्रात प्रा. रुपेश पाटील सातत्याने कार्यरत असून आपल्या प्रेरणादायी व्याख्यानातून ते समाज प्रबोधनात देखील योगदान देत आहेत.

त्यांच्या या यशाबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री व आमदार दीपक केसरकर, धुळे ग्रामीणचे आ. राघवेंद्र उर्फ रामदादा पाटील, माजी आ. प्रा. शरद पाटील, धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मनोहर भदाणे, नगाव गावाच्या लोकनियुक्त सरपंच सौ. ज्ञानज्योती भदाणे, पंचायत समितीचे माजी सभापती अनित भदाणे, भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष डॉ. महेश घुगरी, शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष भूपेंद्र लहामगे, प्राचार्य डॉ. एम.व्ही. पाटील, प्राचार्य डॉ. सतीश पाटील, माजी प्राचार्य रवींद्र पाटील यांसह अनेकांनी अभिनंदन करून प्रा. पाटील यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. प्रा. रुपेश पाटील यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles