सावंतवाडी : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार नारायणराव राणे यांचे कट्टर समर्थक असलेले तसेच विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून गोरगरिबांसाठी सामाजिक कार्य करणाऱ्या संतोष गांवस यांनी आगामी नव्या प्रभाग रचनेत झालेल्या बदलांमुळे सावंतवाडी शहरातील प्रभाग क्रमांक ‘सहा’ मधून निवडणूक लढविण्याची मानसिकता दर्शविली आहे.
तब्बल 35 वर्षांपेक्षा जास्त काळ सामाजिक क्षेत्रात संतोष गांवस सातत्याने कार्य करत असून सांस्कृतिक क्षेत्रातही ते योगदान देत आहेत. सावंतवाडी शहरातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. सिंधुदुर्ग सोडाच पण जग कुठेही गेलं तरी संतोष गांवस मात्र फक्त आणि फक्त नारायण राणे समर्थक म्हणून ओळखले जातात. खा. नारायणराव राणे यांच्या विचारधारेने प्रेरित होऊन त्यांनी आता सक्रिय राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
दरम्यान इच्छुक उमेदवार संतोष गांवस यांच्याशी सत्यार्थाने संपर्क केले असता “आपण फक्त आणि फक्त सन्माननीय नारायणराव राणे यांचे समर्थक असून तेच माझी ताकद आहेत. शेवटी जनतेचा विश्वास आणि सावंतवाडीच्या विकासासाठी शेवटचा श्वास हाच आपला संकल्प”, असा त्यांनी निश्चय केला आहे.
दरम्यान प्रभाग क्रमांक सहा ]मध्ये आगामी सावंतवाडी नगरपरिषदेच्या माध्यमातून सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.


