सावंतवाडी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सावंतवाडी तालुकाप्रमुख पदी कार्यरत असणारे मायकल डिसोजा यांनी शिवसेना पक्ष संघटनेला बाधा येईल असे कार्य करून पक्षाची शिस्त मोडल्याने त्यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे.
दरम्यान त्यांचा शिवसेना पक्षाशी कोणताही संबंध नाही कारण त्यांनी पक्षाच्या तालुकाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे भविष्यात त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेत कोणतेही स्थान देण्यात येणार नाही, असे लेखी पत्राद्वारे शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबुराव दत्ताराम धुरी यांनी कळविले आहे.



