सावंतवाडी : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब हे सातत्याने विकासात्मक कार्यासाठी अग्रेसर असतात. त्याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. माडखोल येथील धनगरवाडी ते कोंबडी भाटले रस्त्यावरून डंपर मोरीवरून जात असताना मोरी कोसळून डंपरचे नुकसान झाले.


दरम्यान बुधवारी संजू परब यांनी सदर घटनास्थळी भेट देत तात्काळ ५० लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजकुमार राऊळ, शंकर राऊळ, सुरेश राऊळ, विजय राऊळ, वासुदेव होडावडेकर, अनिल घाडी, सुभाष राऊळ तसेच शिवसेना उपतालुका प्रमुख राकेश पवार,जीवन लाड यांसह अन्य उपस्थित होते


