मुंबई : मुंबईतील पवई येथील आरए स्टुडिओमध्ये 17 मुलांना ओलीस ठेवल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला. फक्त इतकेच नव्हे तर आरोपीकडे बंदूकसह ज्वलनशिल पदार्थ होती. त्याने व्हिडीओमध्ये संपूर्ण इमारतीला आग लावून देण्याचे भाष्य केले होते. आता या प्रकरणाता मोठा खुलासा झाल्याचे बघायला मिळतंय. आरोपी हा कट मागील काही दिवसांपासून रचत होता. एका दिवसात काहीही घडले नव्हते. पवईतील अपहरण आणि धमकावण्याबाबतचा कट रोहित आर्या मागील तीन महिन्यांपासून आखत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. रोहित आर्याने ‘A Wednesday’ या चित्रपटातील काल्पनिक कथा प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न केला.
रोहित आर्याने या बाल कलाकारांसाठी आॅनलाईन जाहिराती दिल्या होत्या, पवईतील स्टुडिओही स्वत:च भाड्याने बुक केला होता. जाहिरात पाहून राज्याच्या कानाकोपऱ्यातून 70 मुले आॅडिशनसाठी आली होती. यातील 17 मुलांची निवड त्याने केली. ही निवड करताना मुलांचे तीन ग्रुपही बनवले होते. घटना प्रत्यक्षात करत असताना सर्वांनाच हे सर्व चित्रपटाचा भाग आहे, असे वाटत असल्याने आर्याला तितका विरोध झाला नसल्याचे सांगितले जाते.
इतकेच काय तर पोलिसांना घाबरवण्यासाठी प्रशासनाला वेठीस धरण्यासाठी आर्या त्याच्यासोबत दुसऱ्या मजल्यावर असलेल्या त्या 4 मुलांना पेटवणारही होता. याबाबतचं साहित्यही सोबत होतचं. सुरूवातीला 4 मुलांना पेटवण्याचे त्याचे प्लॅनिंग होते आणि त्याच्या व्हिडीओ शेअर करत तो प्रशासनाला वेठीस धरणार असल्याची माहिती पुढे येतंय. आर्याच्या त्या व्हिडिओत तो एकटा नसून अन्य लोकही आपल्यासोबत असल्याचा दावा करताना तो दिसतोय.


