मुंबई : वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि दक्षिण अफ्रिका हे संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना उद्या 2 नोव्हेंबरला होणार असून जेतेपदापासून भारतीय संघ फक्त एक विजय दूर आहे. पण यासाठी गेल्या 20 वर्षांपासून सुरु असलेला नकोसा विक्रम मोडणं भाग आहे.
(Photo- BCCI Twitter)
भारताने या स्पर्धेची सुरुवात विजयाने केली होती. श्रीलंकेला पराभूत करत विजयी प्रवास सुरु केला होता. त्यानंतर पाकिस्तानला पराभूत केलं. पण दक्षिण अफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं. न्यूझीलंडला पराभूत करत उपांत्य फेरीचं तिकीट मिळालं. तर साखळी फेरीतील बांगलादेशविरुद्धचा सामना पावसामुळे ड्रॉ झाला. उपांत्य फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आले होते. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी 338 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान भारताने 5 गडी गमवून 48.3 षटकात पूर्ण केलं. या विजयासह भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता अंतिम फेरीत भारताचा सामना दक्षिण अफ्रिकेशी होणार आहे. त्यामुळे क्रीडाविश्वाला नवा विजेता मिळणार हे नक्की झालं आहे.




