माणगाव : आपल्या गावाचा सर्वांगीण विकास कसा होईल?, हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून प्रामाणिक काम करत असलेली दानशूर व्यक्ती म्हणजे भाजपा तालुका सरचिटणीस योगेश उर्फ भाई बेळणेकर यांनी वाडोस धनगरवाडी येथील विद्यार्थी कु. रमेश भागोजी वरक (वय 14) हा ३ ते ४ किलोमीटर चालत प्रवास परत वाडोस हायस्कूलमध्ये शिकत आहे.
दररोज पायी प्रवास करून त्रास होत होता. श्री.बेळणेकर यांच्याकडून स्वखर्चाने विद्यार्थ्याला सायकल देण्यात आली. वाडोस पंचक्रोशीतून श्री. बेळणेकर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे


