Saturday, November 8, 2025

Buy now

spot_img

मोठी बातमी! – रावसाहेब दानवे यांच्या नातवावर गुन्हा दाखल!

नाशिक : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांचा नातू शिवम पाटील आणि इतर आठ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. नाशिकमधील सातपूर येथील उद्योजक कैलास अहिरे यांची 10 कोटी रुपयांची फसवणूक प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातपूर पोलीस पुढील तपास करत आहेत .कंपनीतीली शेअर भागीदारी आणि आर्थिक व्यवहारातील फसवणुकीसंदर्भात हा गुन्हा दाखल झाला. कैलास अहिरे हे भाजपचेच नाशिक येथील पदाधिकारी आहेत.

प्रकरण काय?

पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, कैलास अहिरे हे भाजप उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. सातपूर एमआयडीसीमध्ये त्यांची एन. व्ही. ऑटो स्पेअर्स प्रा. लि. कंपनी आहे. एका कार्यक्रमात रावासाहेब दानवे आणि त्यांची भेट झाली. कंपनीवर कर्ज असून पैशांची निकड असल्याचे अहिरे यांनी त्यांना सांगितले. त्यावेळी रावसाहेब दानवे हे नाशिकला आले आणि त्यांनी प्रकल्प पाहिले. त्यावेळी त्यांनी सेटलमेंट करुन देण्याचे आश्वासन दिले. त्याबदल्यात कंपनीत 14 टक्के शेअर देण्याची अट ठेवली. त्यानुसार, 25 कोटींचे शेअर्स पवार यांना देण्याचा व्यवहार ठरला. हा व्यवहार झाल्यावर दानवे पुन्हा एकदा नाशिक आले. अहिरे यांना सुरुवातीला 14 कोटी 34 लाख 98 हजार रुपये देण्यात आले. पण उर्वरीत 10 देण्यात आले नाही. त्याविषयी वारंवार संपर्क करूनही टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप अहिरे यांनी केला. तर दुसरीकडे कंपनीचे शेअर्स परस्पर दुसऱ्या व्यक्तीला वर्ग करण्यात आल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले. शेअर व्यवहारातून हा घोटाळा करण्यात आला. त्या नाराजीने अहिरे यांनी तक्रार दिली.

माजी खासदार व माजी मंत्री रावसाहेब दानवे यांच्या नातूसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. कंपनीत 14 टक्के शेअर्स घेण्यासाठी 25 कोटींचा व्यवहार ठरवला, परंतु 10 कोटी न देता शेअर्स स्वतःच्या नावे केल्याप्रकरणी शिवम मुकेश पाटील (दानवे यांचा नातू), गिरीश पवार, सतीश अग्रवाल, संजय कतीरा, सुभाष कतीरा, कौस्तुभ लटके, धीरेंद्र प्रसाद, मंदार टाकळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. फसवणूक रक्कम डमी खात्यांतून हस्तांतरित करणे आणि फिर्यादीची दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणामुळे उद्योगवर्तुळात खळबळ उडाली आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles