पुणे : भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा प्रदेशाध्यक्ष विजय हरगुडे यांच्या मान्यतेने आणि चित्रपट आघाडी प्रदेशाध्यक्ष समीर दीक्षित यांच्या मार्गदर्शनाने तसेच पुणे शहर अध्यक्ष राजीव दत्तात्रय पाटील यांच्या नेतृत्वात चित्रपट कामगार आघाडी खडकवासला मतदारसंघ महिला आघाडी अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्त्या तथा चित्रपट क्षेत्रात योगदान देणाऱ्या रणरागिनी सौ. तृप्ती जितेंद्र बरडे यांची निवड करण्यात आली आहे. सदर निवडीचे पत्र चित्रपट आघाडी कामगार आघाडीचे पुणे शहराध्यक्ष राजीव पाटील यांच्या हस्ते सौ. तृप्ती बरडे यांना प्रदान करण्यात आले.
दरम्यान सौ. बरडे यांच्या या स्तुत्य निवडीबद्दल सर्व स्तरावरून अभिनंदन व कौतुक होत आहे.


