Saturday, November 8, 2025

Buy now

spot_img

‘जय हो!’ – ‘इस्त्रो’च्या ‘बाहुबली’ रॉकेटची कमाल! ; नेव्हीचे सॅटेलाईट ठेवणार पाकिस्तान-चीनवर करडी नजर.

श्रीहरिकोटा : आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर  मधून भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोने आज 2 नोव्हेंबर रोजी 4,410 किलोग्रॅम वजनाचा CMS-03 (GSAT-7R) हा उपग्रह यशस्वीरीत्या प्रक्षेपित केला. हा उपग्रह भारतीय नौदलाचा आतापर्यंतचा सर्वात प्रगत कम्युनिकेशन सॅटेलाइट ठरला आहे. 

बाहुबली रॉकेट’द्वारे यशस्वी मिशन –

CMS-03 सॅटेलाइटचे प्रक्षेपण LVM3-M5 रॉकेट (Launch Vehicle Mark-3) द्वारे करण्यात आले. या रॉकेटला त्याच्या प्रचंड वहन क्षमतेमुळे ‘बाहुबली रॉकेट’ (Bahubali Rocket) म्हणून ओळखले जाते. हे रॉकेट भारतातून भू-समकालिक स्थानांतरण कक्षेत (Geosynchronous Transfer Orbit GTO) सोडण्यात आलेले आतापर्यंतचे सर्वात अवजड सॅटेलाइट आहे.

ISRO ने सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, “LVM3-M5 च्या प्रक्षेपणाची उलटी गणना शनिवारी सायं 5 वाजून 26 मिनिटांनी सुरू झाली होती आणि ती सुरळीतपणे पार पडली. हे प्रक्षेपण रविवारी सायं 5 वाजून 26 मिनिटांनी यशस्वीरीत्या पूर्ण झाले.

 भारतीय नौदलासाठी विशेष सॅटेलाइट

CMS-03 सॅटेलाइट पूर्णतः भारतातच डिझाइन (Designed in India) आणि निर्मित (Manufactured in India) करण्यात आलं आहे. यामुळे नौदलाच्या जहाजांमध्ये, विमानांमध्ये, पाणबुड्यांमध्ये आणि समुद्री ऑपरेशन्स सेंटर्स (Naval Operation Centres) मध्ये सुरक्षित आणि वेगवान कम्युनिकेशन शक्य होणार आहे. हे सॅटेलाइट समुद्रात शत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात मदत करेल, तसेच नौदलाच्या संरक्षण क्षमतेला मोठी गती देईल.

  • तीन टप्प्यांचे अत्याधुनिक रॉकेट –

LVM3-M5 हे तीन टप्प्यांमध्ये कार्यरत अत्याधुनिक रॉकेट आहे,

1. दोन सॉलिड मोटर स्ट्रॅप-ऑन्स (S200)

2. द्रव प्रणोदक कोर स्टेज (L110)

3. क्रायोजेनिक स्टेज (C25)

या तंत्रज्ञानामुळे इस्रो आता 4,000 किलोपर्यंत वजनाचे सॅटेलाइट्स स्वतःच्या तंत्रज्ञानाद्वारे जीटीओ कक्षेत पाठवू शकते. म्हणजेच भारत आता या क्षेत्रात पूर्णतः आत्मनिर्भर (Self-Reliant in Heavy Satellite Launch) झाला आहे.

  • पाचवी यशस्वी ऑपरेशनल फ्लाईट –

ISRO ने सांगितले की LVM3-M5 ही ‘पाचवी ऑपरेशनल फ्लाइट’ (Fifth Operational Flight) असून, भारताच्या अंतराळ मोहिमांमध्ये एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles