- ✍️ साबाजी परब.
- दोडामार्ग : तालुक्यातील मणेरी जिल्हा परिषद मतदार संघ ओबीसी महिला राखीव झाल्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात मानसी दीपक देसाई उतरण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून त्या इच्छुक आहेत तर त्यांचे पती हे कोलझर पंचायत समिती हे सर्वसाधारण पदासाठी झाल्यामुळे या मतदारसंघातून पंचायत समितीची निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. त्यांचे शिक्षण एम. ए., एम. लिब., आणि आय. एस. सी. असे उच्चशिक्षित असल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात येथे पसंती आहे. दरम्यान कोलझर पंचायत समितीच्या निवडणूक रिंगणात दीपक देसाई आणि मणेरी जिल्हा परिषदसाठी मानसी देसाई निवडणूक रिंगणात उतरण्याची दाट शक्यता असल्यामुळे अजित पवार गटाची भूमिका नेमकी काय असणार?, यावरही बऱ्याच गोष्टी येथे अवलंबून आहेत. मात्र देसाई दांपत्याच्या सामाजिक व सौहार्दपूर्ण वागणुकीमुळे विरोधकांपुढे मोठे आव्हान उभे राहणार असल्याची शक्यता आहे. मात्र हे सगळे महायुतीच्या भूमिकेवर अवलंबून आहे. जर महायुती नाही झाली तर आपण स्वतंत्र निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचेही ‘सत्यार्थ’ जवळ दीपक देसाई यांनी सांगितलं.
‘ह्या’ गावांचा समावेश –
मणेरी जिल्हा परिषद गटामध्ये कुंभवडे, फुकेरी, खडपडे, तळकट, झोळंबे, मोरगाव, आडाळी, उगाडे, कोलझर, शिरवळं, कुंब्रल रूमडाची गोठण, कळणे, सासोली, पाट्ये पुनर्वसन, मणेरी, कुडासे, पंतुर्ली, परमे, भिके कोनाळ या गावांचा समावेश आहे.
तर कोलझर पंचायत समिती गणात कुंभवडे, फुकेरी, खडपडे, तळकट, झोळंबे, मोरगाव, आडाळी, उगाडे, कोलझर, शिरवळं, कुंब्रल रूमडाची गोठण आदि गावांचा समावह आहे.


