सावंतवाडी : मागील अनेक दिवसांपासून भाजपच्या वाटेवर असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख मायकल डिसोजा यांचा भाजप प्रवेश अखेर निश्चित झाला आहे. आज सायंकाळी ४ वाजता सावंतवाडी येथे भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या संपर्क कार्यालयात होणार्या कार्यक्रमादरम्यान आपल्या कार्यकर्त्यांसमवेत ते भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार आहेत. मागील काही दिवसांपासून डिसोजा हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र काही कारणास्तव त्यांचा प्रवेश लांबला होता. त्यामुळे त्यांच्या निर्णयाबाबत राजकीय स्तरावरून चर्चेला उधाण आले होते. आज या सर्व चर्चाना पूर्णविराम मिळणार असून आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह मायकल डिसोजा भाजपावासी होणार आहेत.
मायकल डिसोजा आज भाजपात जाणार, उबाठाला अजून एक खिंडार पडणार!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


