- ✍️ रुपेश पाटील.
- सावंतवाडी : काल मोठ्या दिमाखदारपणे भारतीय जनता पार्टीचे युवा नेते विशाल परब यांच्या सावंतवाडी शहरालगत असलेल्या मोर डोंगरी येथे भव्य दिव्य पद्धतीने उभारलेल्या जनसंपर्क कार्यालयाचे दिमाखदारपणे लोकार्पण करण्यात आले.

- सावंतवाडी येथील मोरडोंगरी परिसरात अत्यंत भव्यदिव्य स्वरुपात असलेले विशाल परब यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन काल सायंकाळी श्री. चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, पालकमंत्री नितेश राणे, भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, युवराज लखमराजे भोसले, माजी आमदार प्रमोद जठार, अजित गोगटे, संघटन मंत्री शैलेंद्र दळवी, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर, महिला जिल्हाध्यक्ष सौ. श्वेता कोरगावकर, भारतीय जनता पार्टीचे युवा नेते विशाल परब, सौ. वेदिका परब, सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, जिल्हा उपाध्यक्ष संदीप गावडे, बाबा मोंडकर, सुधीर नकाशे, प्रमोद रावराणे, माजी नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी, दिपाली भालेकर, दिलीप भालेकर, सुजाता पडवळ, गेळे सरपंच सागर ढोकरे, विराग मडकईकर, केतन आजगावकर, प्रसन्ना देसाई, राजन गिरप, संध्या तेरसे, गुरुनाथ पेडणेकर, मळगावचे माजी सरपंच हनुमंत पेडणेकर, कट्टर राणे समर्थक संतोष गांवस, अमित परब, प्रतीक बांदेकर, विक्रांत सावंत, मायकल डिसोजा, पुंडलिक कदम यांसह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- दरम्यान आज सावंतवाडी येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयातून नागरिकांना सेवा देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आज सर्वात प्रथम प्रधानमंत्री आयुष्यमान कार्ड लाभार्थी व्यक्तींना सुपूर्त करण्यात आले आहे.
- दरम्यान “आगामी काळात जास्तीत जास्त नागरिकांनी या जनसंपर्क कार्यालयातून केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांचा अधिकाधिक फायदा घ्यावा”, असे आवाहन युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
काल दिमाखदार ‘लोकार्पण’ अन् आज प्रामाणिक ‘सेवा समर्पण!’ ; भाजपा युवा नेते विशाल परबांच्या जनसंपर्क कार्यालय नागरिकांना सेवेसाठी तत्पर!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]




