Saturday, November 8, 2025

Buy now

spot_img

‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण. : ओरोस आयटीआय येथे उद्या देशभक्तीचा जागर!

संजय पिळणकर. 
ओरोस : राष्ट्रभावनेचा जागर करणाऱ्या उपक्रमांतर्गत वंदे मातरम् गीताला १५० वर्षे पूर्ण होत असल्याने पद्मश्री रमाकांत आचरेकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) ओरोस यांच्यावतीने जिल्हा क्रीडा संकुल,सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे शुक्रवार दि.७ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० ते ११.०० वाजेपर्यंत विशेष सामूहिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी पद्मश्री परशुराम गंगावणे, प्रा.डॉ.सचिन सनगरे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, तहसीलदार विरसिह वसावे, सहाय्यक आयुक्त भैयाजी येरमे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सिंधुदुर्ग आ. सु. देसाई यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.तसेच यावेळी समितीचे विविध मान्यवर,संस्थेचे प्राचार्य,प्रशिक्षक,सर्व शिक्षक व कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने व राष्ट्रगीताने होणार असून त्यानंतर सर्व उपस्थित एकत्रित स्वरात वंदे मातरम् गीत सादर करणार आहेत.
कार्यक्रमादरम्यान वंदे मातरम् गीताचा ऐतिहासिक प्रवास, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचे योगदान आणि या गीताने स्वातंत्र्यलढ्यात केलेली प्रेरणादायी भूमिका यावरही मार्गदर्शनपर भाषणे होणार आहेत.विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना वृद्धिंगत व्हावी,राष्ट्रप्रेमाची जाणीव दृढ व्हावी,या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
आयटीआय प्रशासनाने सर्व विद्यार्थी,कर्मचारी आणि नागरिकांना या राष्ट्रप्रेमाने भारलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहून वंदे मातरम् गीताच्या १५० वर्षांच्या गौरवक्षणाचे साक्षीदार होण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles