Saturday, November 8, 2025

Buy now

spot_img

‘निवडणुकीत व्हीव्हीपॅट वापरा, नायतर बॅलेटपेपरवर घ्या!’, याचिकेवर सुनावणी. ; हायकोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस.

नागपूर राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुंषगाने उच्च न्यायालयाने विविध मागण्यांसाठी याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. गेल्याच आठवड्यात न्यायालायने मतदार यादीसंदर्भाने दाखल 4 याचिका फेटाळून लावल्या आहेत. मात्र, आता व्हीव्हीपॅट मिशन संदर्भाने केलेल्या याचिकेवर निवडणूक आयोगाला नोटीस बजावत 18 नोव्हेंबरपर्यंत उत्तर देण्याचं बजावलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट बसवा, अन्यथा मत पत्रिकांद्वारे निवडणुका घ्या, अशी मागणी काँग्रेस नेते प्रफुल्ल गुडधे यांनी याचिकेद्वारे नागपूर खंडपीठा केली आहे. याप्रकरणी, न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत व्होटर ्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट) यंत्रणेचा वापर न करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव प्रफुल्ल गुडधे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले असून न्यायायालयाने राज्य निवडणूक आयोगाला नोटीस बजावत 18 नोव्हेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहे. याचिकेमध्ये मागणी करण्यात आली आहे कीआयोगाने प्रत्येक ईव्हीएम यंत्रासोबत व्हीव्हीपॅट यंत्रणा सक्तीची करावी किंवा मत पत्रिकांद्वारे निवडणुका घेण्याचे आदेश द्यावे, अशी विनंती करण्यात आली होती. व्हीव्हीपॅट यंत्रणेमुळे मतदारांना त्यांचे मत योग्य उमेदवाराला गेल्याची खात्री पटतेत्यामुळेईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात यावाअशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. त्यावर, न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी करताना नागपूर खंडपीठाने राज्य निवडणूक आयोगाला नोटीस बजावत 18 नोव्हेंबरपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles