मुंबई : ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालंय. वयाच्या 89 व्या वर्षी बॉलिवूडच्या ‘ही-मॅन’नं जगाचा अखेरचा निरोप घेतला. तब्बल सहा दशकं बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याच्या निधनानं संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. धर्मेंद्र यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळं त्यांना सोमवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. काही काळ त्यांना व्हेंटिलेटवरही ठेवण्यात आलेलं. पण, अखेर त्यांच्या निधनाची वृत्त समोर आलं आहे. त्यांच्या मृत्यूनं सिनेसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.


ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांना प्रकृती अचानक बिघडल्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. सरुवातीला उपचारांना ते प्रतिसाद देत होते. पण, नंतर त्यांची प्रकृती काहीशी नाजूक होती. त्यामुळे त्यांना ICU मधून व्हेंटिलेटरवर शिफ्ट करण्यात आलेलं. धर्मेंद्र उपचारांना प्रतिसाद देत, असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिलेलं. पण अखेर त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.
धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान, शाहरुख खान, गोविंदा, आमिषा पटेल यांसारख्या स्टार्सनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतलेली. तब्बल सहा दशकं हिंदी सिनेसृष्टीवर राज्य करणाऱ्या धर्मेंद्र यांची प्राणज्योत मालवली.
1981 मध्ये विजयता फिल्म्स सुरू –
1981 मध्ये, प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते धर्मेंद्र यांनी चित्रपट उद्योगात आपले पाय अधिक मजबूत करण्यासाठी विजयता फिल्म्स हे त्यांचे प्रॉडक्शन हाऊस उघडले. त्यांनी त्यांच्या कुटुंबाचे भविष्य लक्षात घेऊन हे प्रॉडक्शन हाऊस सुरू केले. विजयता फिल्म्सच्या माध्यमातून, धर्मेंद्र यांनी प्रथम त्यांची दोन्ही मुले, सनी देओल आणि बॉबी देओल यांना बॉलिवूडमध्ये आणले, ज्यामुळे त्यांना इंडस्ट्रीमध्ये त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली. यानंतर धर्मेंद्र यांनी त्यांच्या कुटुंबातील पुढच्या पिढीला चित्रपटांमध्ये संधी दिली, त्यांचा नातू करण देओल याची प्रेक्षकांना ओळख करून दिली.
धर्मेंद्र यांची सहा दशकांची प्रदीर्घ कारकीर्द –
धर्मेंद्र यांनी आपल्या सहा दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत ‘शोले’, ‘चुपके चुपके’, ‘सत्यकाम’, ‘सीता और गीता’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांत काम केलं होतं. त्यांच्या अभिनयातील सहजता, करारी व्यक्तिमत्व आणि भावनिक अभिव्यक्ती यामुळे ते आजही प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवलं.


