✍️ – अक्षय धुरी.
- सावंतवाडी : तालुक्यातील कोलगाव निरुखे येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक दोनची विद्यार्थिनी दुर्गा दिनेश जाधव हिने राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धेत 14 वर्षाखालील गटात द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. आपल्या खेळीने तिने सिल्वर मेडल प्राप्त केले असून अत्यंत अभिमानास्पद कामगिरी बजावली आहे. कोलगाव निरुखे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक दोनमध्ये दुर्गा शिक्षण घेत आहे.
- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी, पुणे यांच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय शालेय ज्युडो स्पर्धा बालेवाडी – पुणे येथे नुकत्याच संपन्न झाला. यात कुमारी दुर्गा दिनेश जाधव हिने राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा जुदो कराटे असोसिएशन सावंतवाडीचे संस्थापक व ज्येष्ठ प्रशिक्षक वसंत जाधव यांची ती नात असून प्रशिक्षक दिनेश जाधव यांची सुकन्या आहे.
- दुर्गा जाधव हिच्या या अभिमानास्पद कामगिरीबद्दल तिचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे. आगामी काळात सावंतवाडीची ही कन्या राष्ट्रीय स्तरावरही आपला नावलौकिक नक्कीच मिळवणार!, अशी आशा तमाम सिंधुदुर्गवासीयांना आता लागली आहे.


