सावंतवाडी : सिंधुदुर्ग – रत्नागिरीचे खासदार नारायण राणे यांच्या महायुतीच्या भुमिकेनंतर स्थानिक राजकारण ढवळून निघाले आहे. पालकमंत्री नितेश राणे येऊन गेल्यानंतर आता भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी सावंतवाडीत आले. माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी त्यांची महत्वपूर्ण बैठक घेतली.
या बैठकीस शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब देखील उपस्थित होते. महायुती संदर्भात या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. त्यामुळे युती होणार की तुटणार ? याकडे संपूर्ण सावंतवाडीच लक्ष लागून राहिले आहे


